ब्रह्मांड शक्ती - आकर्षणाच्या नियमावर आधारित आपले गंतव्य

असे कधीतरी आपल्यासोबत घडले आहे याचा अर्थ ब्रह्मांडाचे आणि आपले नाते, कनेक्शन आहे. आणि ते आपल्या जन्मापासूनच आहे.
तर मग ब्रह्मांड सोबत कनेक्ट होणे खरंच इतके सोपे आहे का ? आणि इतके फास्ट त्याचे रिझल्ट मिळू शकतात का? आणि कायम असे कनेक्टेड राहता येते का ? आणि आकर्षणाच्या सिद्धांतानुसार कायम हवे ते मिळवता येते का ?
तर उत्तर आहे – नक्कीच. मनातून विश्वास ठेवा. रिझल्ट 100% मिळेल.

सगळ्यात आधी Law Of Attraction किंवा आकर्षणाचा सिद्धांत याबद्दल असलेले गैरसमज आधी दूर करून घ्या.
“आकर्षणाचा सिद्धांत हे अल्लादिनच्या जादुई चिराग सारखे आहे आणि त्याद्वारे तुम्हाला फक्त 3-4 ईच्छा मागता येतील तर आयुष्यभरासाठी एकदम काहीतरी मागून घ्या” असे आज्जिबत नाही. नक्कीच नाही.

Law Of Attraction द्वारे तुम्ही ब्रह्मांडाशी कनेक्ट झाले तर रोजच्या आयुष्यातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील मग त्या तुम्ही ठरवून आकर्षित करत नसले तरी. तुमच्या छोट्या आणि मोठ्या हरेक ईच्छा पुर्ण होतील. आपोआप. त्यासाठी सारखे तुम्हाला प्रोसिजर फॉलो करायची गरज नाही. ते तुमच्या अंगवळणी पडेल. तुमच्या आयुष्याचा एक भाग होऊन जाईल. आणि हा खरा आकर्षणाचा सिद्धांत आहे.

 

तुम्ही आहात तसेच परफेक्ट आहात. ब्रह्मांडानेच तुम्हाला असे बनवले आहे. त्यामुळे ब्रह्मांडाशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला कोणत्याच अगदी कोणत्याच अटी-शर्थींची बदलावाची गरज नाही. हे 101% अनुभवातून सांगत आहोत.
पहाटे उठणे, ध्यान करणे, सतत सकारात्मक राहणे या नक्कीच चांगल्या सवयी आहेत. परंतु या नसल्या तरी ब्रह्मांड तुमच्या हरेक ईच्छा नक्कीच पूर्ण करेल. जगात हर एक व्यक्तीचा स्वभाव, गुण, वागणे हे वेगळे आहे. सृष्टिनेच ते वेगळे पण जपले आहे आणि ते गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही आहात तसेच ब्रह्मांडासोबत कनेक्ट लवकर व्हाल. कारण तुमचे 100% लक्ष फक्त ब्रह्मांडाशी कनेक्ट होण्यामध्ये असेल ना की स्वतःला बदलवण्यामध्ये.
एखाद्याच मोठ्या प्रसिद्ध व्यावसायिक, खेळाडू किंवा व्यक्तीचे उदाहरण सर्वगुणसंपन्न असू शकते. सगळीच मोठी लोकं सर्वगुणसंपन्न आणि परफेक्ट नसतात. तुम्ही अशा काही लोकांना जवळून अनुभवले ही असेल.

Other Products

“शांती, प्रेम आणि आनंदाने चांगल्या जीवनासाठी तुमचा प्रवास सुरू करा”